|
|

Include information about social workers.. शनिवार, ६ मार्च, २०१०
लोकराज्य आणि त्याचे वाचक यांचे नाते आता असे अतूट बनले आहे की, लोकराज्यमध्ये काय हवे काय नको हे देखील वाचक आपल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून कळवत असतात. विशेषत: विद्यार्थ्यांसाठी नवनवीन सदरे सुरू करण्यासाठीची मोठी मागणी सातत्याने येत असते. याबरोबरच इतरही विविध क्षेत्रांविषयी माहिती प्रसिद्ध करण्याबाबतची विनंती करणार्या प्रतिक्रियाही वाचक पाठवितात. कधी या प्रतिक्रिया पत्रांच्या माध्यमातून तर कधी एसएमएसच्या माध्यमातून येत असतात.
यवतमाळ जिल्ह्यातील बेलोराचे योगेश मानकर यांनी एसएमएसच्या माध्यमातून Please include information about social workers. It's very useful for us. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर वर्धाचे सागर ओडाकवार यांनी Lokrajya is one of the powerful venue for build up once. असे मत व्यक्त केले आहे.
लोकराज्यच्या वाचकांना काय हवे याचा विचार आपल्या आगामी अंकांची तयारी करताना टीम लोकराज्य करत असते. त्यात अशा प्रतिक्रिया मोलाच्या ठरतात. वाचकांनी लोकराज्यशी आपले नाते असेच कायम ठेवावे, हिच अपेक्षा.
केवळ ५० रुपयांत लोकराज्यचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी पुढील पत्त्यावर संपर्क साधा - सहायक संचालक (माहिती), वितरण विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन, बरॅक नं. १९, फ्री प्रेस जर्नल मार्ग, मुंबई- ४०० ०२१ दूरध्वनी क्र. (०२२) २२०२१५३०, २२०२३९५७, |
|